Posts

Showing posts with the label वात्स्यायन

भारतीय अखंड ज्ञानपरंपरा भाग २

Image
           मुली महिला यांच्या शिक्षणाची व्यवस्था अगदी प्राचीन काळापासून भारतात होत होती असे निश्चितपणे म्हणता येते. महिला शिक्षणाचे प्रतिबिंब वेदांमधील गार्गी, मैत्रेयी , लोपामुद्रा, घोषा यासारख्या विदुषींच्या ऋचांच्या माध्यमातून उमटले आहे. कालक्रमात नंतर फक्त मुले अथवा पुरुष यांच्यासाठी सांगितलेले विद्यारंभ, उपनयन, समावर्तन यासारखे १६ संस्कारांमधील शिक्षणाशी संबंधित संस्कार हे मुली , महिला यांच्यावरदेखील केले जात असत. मुले, पुरुष पुढे गुरुकुलात शिकत त्याऐवजी मुली, महिला यांच्या शिक्षणाची व्यवस्था घराघरातून होत असे.           (ऋषी वात्स्यायन यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)         मुली महिला यांच्या  शिक्षणाचा विचार ऋषी वात्स्यायन यांनी लिहिलेल्या 'कामसूत्र' ग्रंथात स्वतंत्रपणे केल्याचे आढळते. भारतात मानवी जीवनाचे चार पुरुषार्थ मानले गेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यातील काम म्हणजे मनात उत्पन्न होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा. या विषयावर ऋषी वात्स्यायन यांचा 'कामसूत्र' हा ग्रंथ प्रसिद्ध आह...