Posts

उत्तराखंड सहलीतील अनुभव

Image
     हिमालय पर्वत आणि गंगा नदी गेली हजारो वर्ष भारतीय माणसाला भुरळ घालीत आहे. या दोन्हीचेही पावित्र्य मनामध्ये खोलवर झिरपले आहे. त्यामुळे हरिद्वार हृषिकेश येथे सहलीला जायचे असा विचार आला. या सहलीला जायचे निश्चित केले. दुसरी गोष्ट म्हणजे कडक उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये काही दिवस थंड हवेचे अनुभवता येतील या विचाराने मी , पत्नी सौ. शैलजा, साडू श्री जवाहर उपासे व सौ. शुभदा उपासे अशा चौघांनी बरोबर जाण्याचे निश्चित केले. १३ मे ते १९ मे अशी उत्तराखंडमध्ये सात दिवस आणि सहा रात्रींची ही सहल होती. गिरीकंद ट्रॅव्हल्सच्या या सहलीमध्ये दिल्ली, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, नैनीताल, मसुरी, हृषिकेश आणि हरिद्वार या ठिकाणांचा समावेश होता. त्यामुळे काही नवीन ओळखी झाल्या.     या सहलीत विमानाचा प्रवास झाला तसा हृषिकेशमध्ये सहासीटर रिक्षाचाही प्रवास झाला. एसीबसने प्रवास झाला तशी वल्ह्याच्या होडीतून नैनीतालमधील तलावात फेरी झाली. हृषिकेशमध्ये मोटरबोटीतून गंगा नदी ओलांडली ते वेगळे . दिल्लीला कडक उन्हाळा अनुभवला तशी नैनिताल आणि मसुरी येथील अल्हाददायक थंडीदेखील अनुभवली. मैदानी प्रदेशात रखरखते ऊन हो...

पुस्तक परिचय 'मी कसा झालो?'

Image
     अंगभूत गुण आणि कर्तृत्व, योगायोग, मिळालेल्या संधी आणि त्या संधीचे रुपांतर यशात करण्यासाठी केलेली धडपड अशा अनेक गुणांनी ज्यांचे आयुष्य विविधरंगी झाले अशी व्यक्ती म्हणजे आचार्य अत्रे. त्यांच्या गळ्यात सत्काराचे हार पडले तसे तुरुंगात जाण्याची वेळदेखील आली. स्तुतीसुमनांचा वर्षाव आणि शिव्याशापांचा भडिमार अशा दोन्ही गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे दंतकथा वाटाव्यात अशा घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या. या आयुष्याची वाटचाल कशी झाली याचे दर्शन घडवणारे पुस्तक म्हणजे 'मी कसा झालो?'.           ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )         १३ ऑगस्ट १८९८ ते १३ जून १९६९ असे जवळपास सत्तर वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. त्या आयुष्यतील १९५३ पर्यंत झालेली वाटचाल सांगणारे हे पुस्तक आहे. तोपर्यंत आचार्य अत्रे यांनी काव्य, विडंबन, शिक्षण, नाट्य, राजकारण , चित्रपट, पत्रकारिता, वक्तृत्व अशा अनेक क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. अशा बहुपेडी आयुष्याची ओळख करुन देणारे अवघड काम या पुस्तकात सहजपणे पूर्ण झाले आहे.      माणस...

चौकटीबाहेरचे उपाय

Image
        माणसांना आयुष्यात अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. हे प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळे उपाय योजावे लागतात. हे उपाय योजताना साधारणपणे बऱ्याचवेळा उत्स्फूर्तपणे जे‌ उपाय सुचतात किंवा ज्या भावना स्वाभाविकपणे निर्माण होतात त्यांच्या आधारावर सुचलेल्या गोष्टी अमलात आणल्या जातात. काहीवेळा आधी ऐकलेले , माहिती असलेले उपाय अमलात आणले जातात.    असे सर्व उपाय साधारणपणे ठराविक प्रकारचे असतात. संबंधित व्यक्ती आपल्याशी नातेसंबंध किंवा मैत्रीने निगडित असेल तर समजावून सांगणे, रागावणे, लहान वयाच्या मुले मुली असतील तर त्यांना फटके देणे किंवा शिक्षा करणे असे उपाय असतात. आर्थिक गरज असेल तर उसने मागणे, आपली गरज समोरच्या व्यक्तीला लक्षात येईल यासाठी जास्तीचे प्रयत्न करणे अशा गोष्टी घडतात. संबंधित व्यक्ती विरोधक, शत्रू किंवा अपरिचित असेल तर शाब्दिक देवाणघेवाण, शिवीगाळ, मारामारी, प्रसंगी प्रभावी मध्यस्थ किंवा पोलिसांची मदत घेणे अशा गोष्टी होतात. आर्थिक विषय असेल तर बळजबरीने पैसे उकळणे, फसवणूक करणे अशा उपायांचा वापर होतो.       पण साधारणपणे असे सर्व उ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मार्गदर्शक दीपशिखा

Image
        काल पटलावर आपला ठसा उमटवून गेलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जीवन एखाद्या दीपशिखेसारखे आहे. ही दीपशिखा तिच्या अंगभूत तेजाने तळपत आहे आणि समाजाला वाट दाखवत आहे. समाज जीवनाची उभारणी होताना काही जीवनमूल्यांची चौकट असणे नेहमीच आवश्यक असते. जगामध्ये वेगवेगळ्या मानव समुहांनी आपल्या समूहासाठी काही मूल्ये आपापल्या वाटचालीच्या, अनुभवांच्या आधारे निश्चित केली. ती जीवनमूल्ये पिढ्यानपढ्या संक्रमित होण्यासाठी काही पद्धती प्रथा परंपरा यांची निर्मिती केली. सर्व मानव समूहांना जगाच्या इतिहासात आपापले स्थान आहे. असाच एक प्राचीन मानव समूह भारतीयांचा आहे. भारताला हजारो वर्षांची जी अखंड परंपरा लाभली आहे. तशी परंपरा अन्य कोणत्या मानव समूहाला लाभली आहे याचे उत्तर नकारार्थी आहे. भारतीय मानव समूहाची जीवनमूल्ये ज्यांच्या जीवनात ओतप्रोत भरलेली दिसतात अशा महान व्यक्तींपैकी अहिल्याबाईंचे स्थान अद्वितीय आहे.           ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       भारतीय समाज जीवनाचा पाया अध्यात्माचा आहे. जीवनाचे अधिष्ठान जेवढे लौकिक असावे अशी ...

आचार्य अत्रे : विनोदी साहित्यिक

Image
      विनोदी लिहिणे हे खूप सोपे आहे अशी बऱ्याच जणांची समजूत असते. परंतु विनोदी लिहिणे हे खूप अवघड असते असे आचार्य अत्रे आणि इतर अनेक साहित्यिकांनी वारंवार सांगितले आहे. आचार्य अत्रे यांना विनोदी लेखन सहजपणे जमत गेले याचे रहस्य त्यांच्या मूळच्या खोडकर स्वभावात आहे असे आपल्याला म्हणता येईल. शाळेमध्ये शिकत असताना सुट्टी मिळावी म्हणून उंदीर मारून शाळेत नेऊन टाकणे, दृष्टी अधू असलेल्या शिक्षकांच्या शेजारी उभे राहून वर्गात वाकुल्या दाखवणे, गुरुजींच्या उपरण्याचे टोक कापणे या आणि अशा पद्धतीच्या अनेक खोड्या त्यांनी केल्या यातून अनेक वेळा हशा पिकला तर काही वेळा आचार्य अत्रे यांना याबद्दल मारदेखील खावा लागला.          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )  परंतु मूळ विनोदी खोडकर स्वभाव केवळ एवढेच असून चालत नाही. तर आचार्य अत्रे म्हणतात तसे , "ज्याला जीवनातील ताल आणि तोल समजतो तोच विनोदी लिहू शकतो." याचबरोबर जीवनाचा असलेला वैविध्यपूर्ण अनुभव हीदेखील आचार्य अत्रे यांची भक्कम जमेची बाजू आहे. त्या आधारावर त्यांना विनोदी लेखन करता आले. हे लेखन अतिशय लोकप्रिय झाले. ...

पुस्तक परिचय : गोष्ट नर्मदालयाची

Image
 गोष्ट नर्मदालयाची  लेखिका प्रव्राजिका विशुद्धानंदा  (भारती ठाकूर ) प्रकाशक विवेक प्रकाशन           ' सत्य संकल्प का दाता भगवान है ' या उक्तीचे स्मरण हे पुस्तक वाचताना मला वारंवार होत होते. गोष्ट ऐकायला तर सगळ्यांनाच आवडते. त्यामुळे जगामध्ये सर्व भाषांमध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी आजपर्यंत सांगितल्या गेल्या आहेत. त्यातील अनेक गोष्टी या काल्पनिक आहेत. तशाच अनेक गोष्टी प्रत्यक्ष घडलेल्यादेखील आहेत. प्रत्यक्ष घडलेल्या काही गोष्टी अशा असतात की त्या काल्पनिक आहेत असे वाटू लागते परंतु त्या मात्र सत्य असतात. अशाच प्रकारची ही गोष्ट आहे नर्मदालयाची.         भारतामध्ये पश्चिम वाहिनी नदी नर्मदा हिची परिक्रमा करण्याची पद्धत शतकानुशतके चालत आली आहे. नाशिकमध्ये केंद्र सरकारच्या नोकरीत असताना एके दिवशी भारती ठाकूर यांना ही परिक्रमा करण्याची प्रेरणा झाली आणि २००५-२००६ मध्ये त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली. परिक्रमा करत असताना जे अनुभव आले त्यावर त्यांनी एक पुस्तकही लिहिले. परंतु त्या परिक्रमेतून सर्वात महत्त्वाचा बदल घडला तो म्हणजे, ' मी अं...

जयंतराव नारळीकर यांचे प्रेरणादायक जीवन

Image
         ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ जयंतराव नारळीकर यांचे निधन झाले. भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीसाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. भारतात विज्ञान हा विषय लोकप्रिय व्हावा यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले.          ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )       जयंतराव नारळीकर यांनी आपले जीवनानुभव 'चार नगरातील माझे विश्व' या आत्मचरित्रपर पुस्तकात सांगितले आहेत. या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्या पुस्तकामधील काही गोष्टींची आठवण झाली.  हे पुस्तक मी अनेक वर्षांपूर्वी वाचले आहे. त्यामुळे आठवणीच्या आधारावर हे प्रसंग लिहिले आहेत.      जयंतराव यांचे वडील हे बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक होते. तेदेखील गणितज्ञ होते. त्या काळात अतिशय अवघड मानली जाणारी परीक्षा उत्तीर्ण होऊन रॅंग्लर झालेले होते. तसेच त्यांच्या आईदेखील उच्चशिक्षित होत्या. वडिलांची कीर्ती अखिल भारतीय असल्यामुळे अनेक लोक आवर्जून त्यांच्या घरी येत असत. त्यापैकी एकाने जयंतरावांच्या वडिलांना सल्ला दिला. जयंतराव त्यावेळी लहान...