कोरोना वारियर्स आप लढो....
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृह संचलित विलगीकरण केंद्र जगावर ओढवलेल्या कोरोना या आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हिरिरीने पुढे आली. संस्थेकडून विविध पद्धतीने मदत कार्य केले गेले. त्यापैकी संस्थेच्या महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहामध्ये सुरू केलेल्या विलगीकरण केंद्राची माहिती. २०२० च्या मार्च महिन्यामध्ये मा. जिल्हाधिकारी पुणे यांनी आदेश दिल्यानुसार सरकारच्या वतीने विलगीकरण केंद्रासाठी वसतिगृह अधिगृहित करण्यात आले. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी गावी गेलेले असल्याने कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वसतिगृहातील आवश्यक त्या व्यवस्था सुरू ठेवल्या होत्या. ज्या वस्त्यांमध्ये कोरोना या विषाणूचा तीव्र संसर्ग आहे अशा वस्त्यांमध्ये डॉक्टरांच्या टीमने जाऊन घरोघरी वैद्यकीय सर्वेक्षण करण्याची योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिका यांच्यावतीने करण्यात आली. सर्वेक्षणासाठी जाणारे डॉक्टर आणि त्यांचे ...