Posts

सामाजिक कार्यकर्त्यांसाठीचा आदर्श दीपस्तंभ

Image
       भारत वर्षाच्या अवनीतीची कारणमीमांसा करून त्यावर उपाय योजना करणारे पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे विलक्षण व्यक्तिमत्व होते. त्यांचे सर्व जीवनच हा सामाजिक कार्य करू इच्छिणाऱ्यांसाठी वस्तूपाठच आहे. या आदर्श जीवनाचे त्यांच्या जयंतीनिमित्त केलेले हे चिंतन. सामाजिक कार्यकर्त्यांची ध्येयनिष्ठा ही अभंग असावी लागते. कोणत्याही कारणाने यामध्ये तडजोड होणे अथवा करणे योग्य नाही. पूजनीय डॉ. हेडगेवारांच्या जीवनातून ही गोष्ट आपल्या लक्षात येते. १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुरू केल्यापासून त्यांनी आपल्या जीवनात इतर कोणत्याही गोष्टींना प्राधान्य दिले नाही. १९३९ डॉक्टर विश्रांती व उपचाराकरिता बिहार मधील राजगीर या ठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांच्या अनुमतीशिवाय आणि अनुपस्थितीत हिंदू महासभेच्या वतीने उभारल्या जाणाऱ्या रामसेनेचे प्रमुख म्हणून त्यांचे नाव डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी घोषित केले. डॉ.मुंजे हे वडीलधारे व्यक्तिमत्त्व. त्यांनी अनेक वेळा डॉक्टर हेडगेवार यांची पाठराखण केली होती. परंतु अशा पितृतुल्य व्यक्तिमत्वाने परस्पर नाव घोषित करावे आणि संघ कार्य हे जीवित ...

गुंतागुंतीचे आयुष्य

Image
      काही दिवसांपूर्वी एका बैठकीत एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणाले, " बांधकामासाठी साहित्य पुरवणाऱ्यांचा एके ठिकाणी संप चालू आहे. त्यामुळे अपेक्षित वेळेत हा प्रकल्प पूर्ण करता येणार नाही. म्हणून जादा दिवस गृहित धरले आहेत." हे ऐकल्यावर मनात विचार आला की आयुष्य किती गुंतागुंतीचे झाले आहे. कुठेतरी एखादी घटना घडते आणि त्याचे दूरवर परिणाम होतात.            ( बांधकाम चालू असतानाचे प्रातिनिधिक छायाचित्र  )        भारतात हजारो वर्षे जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात राहत आलेली आहे. पूर्वी ही गावे बऱ्यापैकी स्वयंपूर्ण होती. गरजेच्या बहुतेक सर्व गोष्टी गावातच तयार व्हायच्या. मर्यादित प्रमाणात बाहेरून गोष्टी आणाव्या लागायच्या. त्यामुळे बाह्य गोष्टी, घडामोडी यांचा थोडा परिणाम ग्रामजीवनावर व्हायचा. तसेच लोकांच्या एकूण गरजाही मर्यादित होत्या. त्यामुळे आयुष्य हे बऱ्यापैकी सरळसोट होते.        पण औद्योगिक क्रांतीनंतर जगातील एकूणच परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. यंत्रांवर आधारित मोठे मोठे कारखाने सुरू झाले. घाऊक प...

दुचाकी लावताना

Image
     " बरं, झालं तुम्ही गाडी मेन स्टॅंडवर लावली." मध्यंतरी मी एके ठिकाणी गाडी लावताना शेजारी लावलेली स्वतःची गाडी काढण्याची वाट बघत असलेले एकजण मला म्हणाले. " मी नेहमी मेन स्टॅंडवर गाडी लावतो." मी उत्तर दिले. याबद्दल मनात नेहमीच विचार येत असतो.              ( छायाचित्र इंटरनेटवरून साभार )      पुणे शहरात दुचाकींची संख्या खूप मोठी आहे. बहुतेक वेळा बऱ्याच गाड्या साईड स्टॅंडवर लावलेल्या दिसतात.‌ साईड स्टॅंडवर गाडी लावणे जास्त सोपे आणि चटकन होणारे असते. त्यामुळे महिला आणि पुरुष दोघेही सहजपणे गाडी साईड स्टॅंडवर लावतात. अनेक वेळा असे होते की मेन स्टॅंड वापरले जातच नाही. त्यामुळे चुकून कधी ते वापरायचे म्हटले तर सहजासहजी शक्य होत नाही. त्यासाठी खूप ताकद लावावी लागते. दोन वाहनांच्या मध्ये असलेल्या थोड्याशा जागेत गाडी लावता येत नाही. तेव्हा आजूबाजूची वाहने मेन स्टॅंडवर लावण्यासाठी खूप खटपट करावी लागते.        साईड स्टॅंडवर गाडी लावली की त्यासाठी जास्त जागा लागते. साधारण १५% जास्त जागा लागते असे मला वाटते. म्हणजे ...

एक संस्मरणीय दिवस

Image
     काही दिवस उजाडण्यापूर्वीच ते संस्मरणीय होणार याची खात्री असते. काही वेळा दिवस पूर्ण झाल्यावर तो संस्मरणीय झाला हे लक्षात येते. माझ्यासाठी असाच संस्मरणीय ठरलेला दिवस म्हणजे २ डिसेंबर २०२२.        संस्थेच्या कामासाठी २ डिसेंबर २०२२ ला दिल्ली येथे जायचे ठरले. लोटे घाणेखुंट, ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथील म.ए.सो. आयुर्वेद महाविद्यालयाच्या कामासंदर्भात ही भेट होती. भारतीय चिकित्सा पद्धती आयोगाचे अध्यक्ष डॉ. जयंत देवपुजारी यांना भेटणे आणि आयुष खात्याचे मा.केंद्रीय मंत्री श्री. सर्वानंदजी सोनोवाल यांची शक्य झाल्यास सदिच्छा भेट घेणे ही दोन कामे त्यादिवशी व्हावीत अशी कल्पना होती. शक्य झाल्यास मंत्री महोदयांची भेट घेणे असे लिहिले कारण डॉ. देवपुजारी यांनी भेटीची वेळ दिलेली होती परंतु मंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून भेटीबाबत निश्चित समजले नव्हते. त्यांचे स्वीय सहाय्यक श्री सैकिया यांच्याशी मोघम संपर्क झाला होता. त्यामुळे दोन डिसेंबरला दिल्लीत जाऊन भेट होते का असा प्रयत्न करायचे ठरले.      दोन डिसेंबरला सकाळी साडेसात वाजताच्या विमानाने नियामक मंड...

केसांची कहाणी

Image
    " ही पुढे आलेली बट फार कापायला नको." काही दिवसांपूर्वी केस कापायला गेलो असताना केशकर्तनकार गृहस्थ म्हणाले. " हो , ना! " मी म्हटलं. कारण पडलेलं टक्कल थोडं झाकायचं काम ही बट करते आहे हे त्यांना म्हणायचं होतं. थोडंसं हसू आलं.      ( गेल्या वर्षीच्या एका कार्यक्रमातील छायाचित्र)     एखादा माणूस पहिल्यांदा भेटला की सुरूवातीला नजरेत भरते त्याची उंची,आकारमान आणि असेल तर केशसंभार किंवा टक्कल! त्यामुळे पुरूषमंडळीदेखील स्वतःच्या केसांबाबत बऱ्यापैकी जागरूक असतात. वय वाढत जाते तसे केस हळूहळू पांढरे होत जातात. असे पांढरे होणारे केस काहीजणांना नको वाटतात. मग मेंदी लावणे, केसांना रंग लावणे असे प्रकार सुरू होतात. नियमितपणे रंग लावणारा एखादा माणूस एखाद्यावेळी रंग लावायला उशीर करतो. मग काही केस स्वतःचा नैसर्गिक रंग दाखवतात आणि बाकीच्यांना लक्षात येतं की त्या माणसाचे केस पांढरे झाले आहेत. काही जण फक्त डोक्यावरील केसांना‌ रंग लावतात आणि मिशांना‌ रंग लावत नाही किंवा लावायचे विसरतात. अशावेळी डोक्यावरील केस काळे आणि मिशा काळ्यापांढऱ्या असं थोडं गंमतीदार दिसतं.  ...

लग्नसोहळ्यातील गमतीजमती

Image
    'तोरणदारी आणि मरणदारी जायलाच हवे' अशी आपल्याकडे जनरूढी आहे. तोरणदार म्हणजे ज्यांच्याकडे मंगल प्रसंग विशेषत: विवाह सोहळ्याचा प्रसंग आहे असे घर. अशाच काही लग्नसोहळ्यातील मी अनुभवलेले हे थोडे गमतीचे प्रसंग.   मी महाविद्यालयात शिकत असताना एका मित्राच्या नातेवाईकाच्या लग्नाला जायचा प्रसंग आला. त्याकाळी लग्नमंडपात खुर्च्या टाकण्याची फार पद्धत नसे. जमीनवरच गाद्या, सतरंज्या टाकलेल्या असत. लग्नातील शेवटची मंगलअष्टका झाल्यावर लोक जागेवरच डावीउजवीकडे फिरून बसत आणि जेवणासाठी पंगती तयार होत. आम्ही या लग्नात पहिल्या पंगतीला जेवायला बसायचे असे ठरवून गेलो होतो. लग्न लागले. आम्ही जेवढ्या तयारीत होतो त्यापेक्षा अन्य वऱ्हाडीमंडळी जास्त तयारीत होते. त्यामुळे आम्हाला पहिल्या पंगतीला बसायला जागा मिळाली नाही. म्हटलं काही हरकत नाही. आता दुसऱ्या पंगतीला बसू. पण आमची तयारी कमी पडली . आम्हाला दुसऱ्या काय पण तिसऱ्याही पंगतीला बसायला जागा मिळाली नाही. शेवटी मित्राने काहीतरी करून जिथे स्वयंपाक चालला होता त्याच खोलीत आम्हाला जेवायला बसवले.      संभाजीनगरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा...

एका प्रेरणादायक आणि आनंददायक प्रक्रियेतला सहभाग

Image
     " सुधीरजी , तुम्हाला यावर्षीच्या 'बाया कर्वे पुरस्कार ' निवड समितीमध्ये सदस्य म्हणून काम करायचे आहे काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ कार्यकर्ते आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे मा.कार्याध्यक्ष श्री. रवी देव यांचा मला फोन आला. त्यांनी आग्रहपूर्वक केलेल्या सूचनेला नकार देणे हा पर्यायच नव्हता. तेव्हापासून या प्रक्रियेत मी सहभागी झालो.      गेली २६ वर्षे सलगपणे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या महिलेला दरवर्षी २९ नोव्हेंबर या दिवशी 'बाया कर्वे पुरस्कार'  दिला जातो. हा पुरस्कार कोणाला द्यायचा यासाठी दरवर्षी वेगवेगळी समिती नेमली जाते. यावर्षीच्या २७ व्या पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्मिताताई घैसास , राष्ट्र सेविका समितीच्या श्रीमती पौर्णिमाभाभी शर्मा यांच्याबरोबर  सदस्य म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. समितीच्या बैठका सुरू झाल्या. या बैठकांमध्ये आमच्याबरोबरच श्री.रवी देव, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती व...